MoU signed with Saraswati Prathamik Sahala Paranda
एका नव्या आणि उज्ज्वल भविष्याची सुरुवात ! आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, बालशिक्षणाला बळ देण्यासाठी प. पू. सद्गुरू श्री मोहन महाराज स्मृती मंदिर ट्रस्ट, अंजनसिंगी, अमरावती आणि एस.आर.जी. एज्युकेशन फाउंडेशन (SRG Education Foundation) यांनी एकत्र येत एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने (Joint Venture), गोरगरीब, गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी मिळावी या उद्देशाने सरस्वती साधना शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. याच समाजोपयोगी उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणून, आम्ही आमचा पहिला सामंजस्य करार (MoU) सरस्वती प्राथमिक शाळा, परंडा सोबत यशस्वीरित्या स्वाक्षरी केला आहे. या करारानुसार शाळेतील गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल. शिक्षणाचा प्रकाश प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे. या प्रवासात
तुमच्या सदिच्छा आणि पाठबळ नेहमीच आमच्यासोबत असू द्या!.